चंद्रपूर -दिनांक 23 सप्टेंबर 2024 ला संस्कार सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, भारत सरकारचे माजी मंत्री, सुसंस्कृत आणि सुस्वभावी राजकारणी, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणारा संवेदनशील नेता, स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन करण्याकरिता सरदार पटेल महाविद्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याच प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रा. प्रमोद शंभरकर, प्रा. अजय बेले, आर्मी चा अग्निवीर रितिक सिंग ठाकूर, SUO प्रणय वाढीवे, JUO दीपक पोद्दार व महाविद्यालयातील विदयार्थीनी रक्तदान केले.
सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग ,राष्ट्रीय स्वयं सेवक विभाग, शारीरिक शिक्षण विभाग तथा आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शांताराम जी पोटदुखे यांना आदरांजली वाहण्याकरिता रक्तदान शिबिर तथा दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक तथा विद्यार्थी आणि राष्ट्रीय छात्र सेना चे कॅडेट्सनी रक्तदान करून श्री शांताराम जी पोटदुखे यांना आदरांजली वाहिले.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शांताराम जी पोटदुखे यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त आदरांजली वाहण्याकरिता सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद सावकर पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष श्री किशोर भाऊ जोरगेवार, सचिव प्रशांत भाऊ पोटदुखे , सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित सर प्रामुख्याने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर सर उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माध्यमशेट्टीवार सर , गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके सर , शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप गोंड सर, राष्ट्रीय स्वयंसेवक विभाग प्रमुख डॉ. उषा खंडाळे , राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख मुलींचे लेफ्टनंट कांचन रामटेके तथा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, सुबेदार हरी सिंग ध्यानी, हवालदार संजय पटले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शांताराम जी पोटदुखे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.