दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे नुकताच महान संगीतकार यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत संगीताचा कार्यक्रम *“गीत गाता चल संगीत उत्सव”* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री.प्रदीप अडकिने श्री.सुभाष शिंदे, श्री.दुष्यंत नगराळे, श्री.अशोक नंदुरकर, श्री.किशोर तळवेकर, श्री.बोरीकर साहेब, श्री.सुभाष साबळे, श्री प्रकाश कुंटेवार,अर्चना मानवलकर मॅडम यांची उपस्थित होती. यांच्या हस्ते दीप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात अनाथ,अपंग, गरजू व्यक्तींना व्हिनस कल्चरल ग्रुप तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.जगदीश नंदुरकर यांनी केले,तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुंदर आवाजात श्री. अस्लम खान यांनी केले, तसेच सदर कार्यक्रमास गायक कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात सुंदर गीते सादर केले, त्यात राजेश धोंगडे, मोहम्मद रफीक , विश्वास तग्रपवार, विनोद बुटन , ज्योती तोहगावकर,रश्मी हिवरे,शोभना शेख,सारिका नाकाडे, रिद्धी राऊत,रजनी परसराम,नेहा महंती, रागिनी धोंगडे,तर सहगायक म्हणून भूषण पिंपळशेंडे,अतुल किन्हेकर,रुपेश बावणे यांचा समावेश होता. प्रेक्षकांनी गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला, या कार्यक्रमाचे आयोजन व्हिनस फ्रेंड्स कल्चरर गृप आणि निसर्ग बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर चे श्री.विकास पडगेलावर, श्री. नितीन नंदनावर, श्री.सुशील तळवेकर, श्री.शब्बीर शेख, सुदेश भालेकर ,यांनी केले.साऊंड सिस्टीम निखिल गटल्लेवार,लायटिंग श्री.श्रीकांत पारशिवे यांनी केले,या कार्यक्रमाचे आभार श्री.विकास पडगेलवार यांनी मानले.