सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्पाद्वारे हवेमध्ये खाणीतून निघालेली लाल मातीचे कण व लोह दगडातील शुष्म कण हवेमध्ये उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. लोह खनिज खाण मध्ये होत असलेल्या बॉम्ब ब्लास्टिंग मुळे व लोह खनिज खाणीतील घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या ह्यारे जंगलातून गोदावरी नदीमध्ये सोडत असल्यामुळे तेथील वन्य प्राणी व वन्य वनस्पती नष्ट होत आहे. मानवी जीव, जल प्राणी वन्य प्राणी पाळीव प्राणी यांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे व आजाराची लागण नवजात शिशु चा मृत्यू, दमा, हृदय विकार, त्वचा रोग, डोळ्याचे विकार, मेंदूचे विकार, क्षयरोग, कर्करोग अशा अनेक आजाराची सुधा लागण झालेली आहे.१) लोह खनिज उत्खनन करते वेळी बॉम्ब ब्लास्टिंग मुळे हवेमध्ये शुस्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.१) लोह खनिज हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुस्म कण उडत असल्यामुळे घातक वायू२) लोह खनिज खाणीतून निघणार्या लोह खनिज मधून निघणारा ओवर बर्डन हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुस्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.३) लोह खनिज व खाणीतून निघणारे ओवर बर्डन ट्रक व हायवा गाडीमध्ये हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुस्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.४) जड वाहतुकीद्यारा कायद्याचे उल्लंघन करून वास्तूकिमुळे सुरजागड लोह खनीज प्रकाल्पासून एटापल्ली, आलापल्ली, गोंडपिपरी, आक्सापूर, पोम्भूर्ण, केळझर, कोठारी बामणी या गावातील रस्ते व आजूबाजूचा परीसर लोह खनिजाचे हवेमध्ये उडते शुष्म कनामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.५) लोह खनिज खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या यारे जंगलातून नदीमध्ये सोडत असल्यामुळे घातक जल प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.६) सुरजागड लोह खनिज प्रकल्प केळझर व राजुरा रेल्वे सायडिंग वर लोह खनिज हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुस्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्प द्यारे पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करणात येणार आहे.राजेश वारलुजी बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था, चंद्रपूर