StarVCM Newz
चंद्रपूर शहरातील शहर पोलीस स्टेशन अंतर्गत
चालणारे अवैध दारू दुकान बंद करण्यासाठी स्त्री शक्ती महिला फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा कांबळे यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिनांक 1/7/2024 रोजी निवेदन दिले. त्यानंतर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
बाबूपेठ येथे आशिष चांदेकर हे दिवसाढवळ्या दारूचे दुकान चालवत असल्याची तक्रार वॉर्डवासीयांनी शिल्पा कांबळे यांच्याकडे दि.1/7/2024 व 2/7/2024 रोजी अधीक्षकांना निवेदन दिले.
बेकायदेशीरपणे सुरू असलेली दारूची दुकाने बंद करण्यासाठी पोलीस व पोलीस निरीक्षक यांना आज दि. 10/7/2024 रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
आजपर्यंत पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांनी आश्वासन देऊनही कारवाई का झाली नाही माहीत नाही पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही?
असा सवाल शिल्पा कांबळे यांनी केला असून पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.