दिनांक 15 एप्रिल 2014 या दिवशी सरदार पटेल महाविद्यालय येथे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र करिअर कट्टा आणि सरदार पटेल महाविद्यालय यांच्यातर्फे चंद्रपूर जिल्हा internship व OJT एकदिवशीय कार्यशाळा करियर कट्टाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोळे यांच्या मार्गदर्शनात व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर यांच्या उपस्थिती घेण्यात आली सरदार पटेल महाविद्यालयाचे समन्वयक व जिल्हा समन्वयक डॉ प्रकाश बोरकर व प्रा. संदेश पाथरडे यांच्या सहयोगाने पार पडली या कार्यशाळेला चंद्रपूर जिल्ह्यातील येणारे महाविद्यालयाचे प्राचार्य व करिअर कट्टा समन्वयक उपस्थित होते. माननीय यशवंत जी शितोळे यांनी सभेला मार्गदर्शन केले. सीएसआर बद्दल विस्तृत माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्याला करियर कट्टामार्फत एक कोटी रुपयाचा निधी मिळणार असून त्यासाठी विविध महाविद्यालयातर्फे सीएसआर मागविण्यात आले होते त्या प्रोजेक्ट संदर्भात महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष व महाविद्यालयाच्या प्राचार्य व सर्व समन्वयक यांच्यासोबत चर्चा झाली आणि जे प्रस्ताव जिल्हा समन्वयकाकडे पाठवण्यात आले त्यावर प्राचार्य प्रवर्तक व जिल्हा समन्वयक यांनी विचार विनिमय करून चांगले प्रोजेक्ट पाठवण्याचे सुचविण्यात आले. या कार्यशाळेला श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील प्राचार्य उपस्थित होते. विविध महाविद्यालयाचे समन्वयक यांनी श्री यशवंत शितोळे सर यांच्याशी संपर्क करून आपल्या प्रोजेक्ट संदर्भात माहिती करून घेतली.