चंद्रपूर – महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘करिअर कट्टा ‘उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील सरदार पटेल महाविद्यालयातील ‘करिअर कट्टा’ ला जिल्हास्तरीय उत्कृष्ठ महाविद्यालयीन प्रथम पुरस्कारासह ४ पुरस्कार मिळाले आहेत. सदर पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांच्यासह समन्वयक प्रा. संदेश पाथर्डे व डॉ. प्रकाश बोरकर यांनी नागपूर धनवटे नॅशनल कॉलेज येथे एका कार्यक्रमात स्वीकारले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता यांचे संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा ‘उपक्रम राबविला जात आहे. त्याच अंतर्गत घेण्यात आलेल्या २०२३-२४ सत्राचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. त्यात राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या ‘करिअर कट्टा ‘ला जिल्हास्तरीय उत्कृष्ठ महाविद्यालयीन प्रथम पुरस्कार, नागपुर विभागीय उत्कृष्ठ महाविद्यालय व्दितीय पुरस्कार, उत्कृष्ठ महाविद्यालय करीयर संसद प्रथम पुरस्कार व महाविद्यालयीन समन्वयक डॉ. प्रकाश बोरकर यांना व्दितीय पुरस्कार प्राप्त झाला. सदर पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांच्यासह समन्वयक प्रा.संदेश पाथर्डे व डॉ. प्रकाश बोरकर यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्वीकारले.
नागपूर येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर संतोष चव्हाण सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग व मा. प्रफुल्ल पाठक ,सेक्रेटरी पावर सेक्टर स्किल कौन्सिल उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर उदय निरगुडकर स्वतंत्र संचालक एन एच पी सी यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा चे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोळे, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. हेमराज देशमुख, मा. प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे प्राचार्य प्रवर्तक नागपूर विभाग, मा. प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे प्राचार्य प्रवर्तक नागपूर विभाग, मा. डॉ. अजय कुमार मोहबंसी ,मा. प्राचार्य डॉ. ईश्वर मोरे गोंदिया विभाग, मा. प्राचार्य ज्ञानेश्वर मशाखेत्री गडचिरोली विभाग, मा. प्राचार्य डॉ. एल एस लडके व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. प्रमोद काटकर या सर्वांच्या उपस्थितीत व नागपूर विभागात अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे महाविद्यालयीन समन्वयक व जिल्हा समन्वयक यांच्या उपस्थितीत यापुरस्कार सोहळ्यात सरदार पटेल महाविद्यालयाच्या शिरपेचात एकूण चार पुरस्कार मिळूवून आपले प्रथम स्थान निश्चित केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे समन्वयक प्रा. संदेश पाथर्डे व डॉ. प्रकाश बोरकर यांनी अतिशय परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्न करून हा पुरस्कार मिळवला असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांच्यासह प्राध्यापकांनी दिली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार,उपाध्यक्ष सुदर्शन निमकर,सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहरराव तारकुंडे, सदस्य आ. किशोर जोरगेवार, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, संदीप गड्डमवार, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्यासह या उपक्रमाचे समन्वयक प्रा. संदेश पाथर्डे व डॉ. प्रकाश बोरकर यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.