चंstar VCM न्यूज़
द्रपूर : इको-प्रो च्या हिवाळी अधिवेशन निमित्त एक दिवस एक आंदोलन सुरू असून आज चवथ्या दिवशी, चवथे आंदोलन चंद्रपूर शहरातील जीवनदायिनी असलेल्या झरपट व इरई नदीच्या संवर्धनाच्या मागणिकरिता या दोन नद्यांच्या संगमावर “नदी वाचवा सत्याग्रह” करण्यात आला. (Eco-Pro’s Zarpat – “River Save Satyagraha” for Irei River Conservation)
- झरपट व इरई नदी कृती आराखडा ची अंमलबजावणी करण्याची मागणी
- नदी प्रदूषणमुक्त, सांडपाणी मुक्त करण्याची मागणी • शहराच्या जीवनदायिनी असलेल्या नदी वाचवा करिता सत्याग्रह
चंद्रपूर शहराच्या जीवनदायिनी म्हणून ओळखले जाणारे झरपट व इरई या नद्याला अवकळा आल्या आहेत, प्राचीन काळी या नद्यांच्या काठावर लोकपूर, इंदूपुर व गोंड काळात चंद्रपूर शहर वसले, ते या नद्यांच्या प्रदेश पाहूनच, प्रचंड पुराचा धोका असताना सुद्धा ही शहरे वसली, मात्र गोंड काळात या नद्यांच्या पुरापासून वाचविण्यासाठी संपूर्ण शहराला वेढा बांधून किल्ला परकोट भिंत बांधली. या नद्यांच्या काठावर प्राचीन अंचलेश्वर, महाकाली मंदिर देवस्थान आहेत. कधीकाळी या शहराचे वैभव असणारे, आज या नद्या मात्र शहरातील सांडपाणी वाहून नेणारी तसेच उद्योगिक प्रदूषित जल वाहून नेणारी नद्या राहिल्या आहेत.
2022 व 2023 ला नद्यांचे सर्वेक्षण मध्ये या जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा व पैनगंगा या नद्या प्रदूषित आहेतच, यापेक्षा गंभीर स्थिती मात्र झरपट व इरई या शहरातून वाहणाऱ्या नद्यांची झालेली आहे. खरे तर झरपट व इरई या नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत, या नद्यांचे उगम जंगल भागातून झाले असले, स्वच्छ प्रवाह उगमापासून असला तरी शहरात येताच उद्योग आणि नागरी वस्तीमुळे या प्रदूषित पाणी वाहून नेतात. नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये असे ग्रीन ट्रिब्युनल चे आदेश असताना, विविध अकॅशन प्लॅन, कृती आराखडे असताना सुद्धा ते फक्त कागदावरच आहेत.
आज करण्यात आलेल्या नदी संवर्धन सत्याग्रह आंदोलन मध्ये इरई-झरपट नद्यांचा कृती आराखडयाची अंमलबजावणी केव्हा?, ‘चंद्रपूर शहराची जीवनदायिनी की ‘प्रदूषित नाला’, ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम केव्हा राबविणार?, दूषित व सांडपाणी नदीत सोडणे केव्हा थांबणार?, नदीत जाणारे प्रत्येक नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया संयंत्र केव्हा लागणार?, उद्योगाचे सोडले जाणारे सांडपाणीवर प्रक्रिया केव्हा होणार?, नदी पात्रातील अतिक्रमण केव्हा थांबणार?, नद्यांचे खोलीकरण केव्हा होणार?, नदी पात्रा लगतचे ओव्हर बर्डन समस्या केव्हा दूर होणार? या झरपट व इरई नद्या संवर्धन विषयक मागण्याचे फलक हातात घेऊन “वाचवा वाचवा नद्या वाचवा”, मुक्त करा, मुक्त करा, प्रदूषणापासून नद्या मुक्त करा”, “झरपट-इरई नदी कृती आराखडा ची अंमलबजावणी करा” आदी घोषणा देत इको-प्रो सदस्यांनी नदी पात्रात उभे राहून आंदोलन केले.
इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात अब्दुल जावेद, राजू काहिलकर, प्रमोद देवांगण, सुरज कावळे, स्वप्नील मेश्राम, भूषण ढवळे, चंदू ओशाखा, अमित कुमरे, धीरज शेंडे, लोकेश भलमे, योजना धोतरे, प्रगती मार्कंडवार, प्रज्ञा नवले, लक्ष्मी गोखरे, हर्षाली खारकर, करिश्मा बुऱ्हाण, नेत्रदीपा चिंचोलकर, आकांशा गाऊत्रे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.