चंद्रपूर
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज दि. १३/१०/२०२३ ला मतदार नोंदणी प्रक्रिया २०२३ हा कॅंम्प सिपेट सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्य श्री. ऱवी मेहंदळे
गटनिदेशक श्री टोंगे सर सौ. झाडे मॅडम श्रीं बोढेकर सर
शि. निं अजय साखरकर सर श्री गराड सर श्री घटे सर श्री मार्तीवार सर व प्रशीक्षणार्थी हजर होते. यावेळी विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाद्वारे नव मतदार जागृतीसाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मतदार यादीत नाव नोंदणी करीता आवश्यक त्या सर्व महत्त्वपूर्ण बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. अजय साखरकर यांनी याबाबत संपूर्ण माहीत देत विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले.