महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर विभाग जिल्हास्तरीय आढावा बैठक आज नागपूर येथे घेण्यात आली. या बैठकीत चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी वर्षभर केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा सादर केला. सादर केलेल्या अहवालानुसार, चंद्रपूर काँग्रेसने गेल्या वर्षभरात विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांचे आयोजन केले. यामध्ये मोर्चे, आंदोलने, निवेदने आणि मदतकार्य यांचा समावेश आहे. तसेच, काँग्रेसच्या पक्ष विस्तारासाठीही विविध उपक्रम राबवण्यात आले.
या अहवालावर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी चंद्रपूर शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले. त्यांनी पुढील काळातही या कामगिरीला कायम ठेवण्याचे आवाहन केले.
या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितिन राऊत, सुनिल केदार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आ. अभिजित वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडियाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह नागपूर विभागातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.