आज दि.8/10/23 ला खोब्रागडे कॉम्प्लेक् जीवीस येथे डॉ बाासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ची वार्षिक सभा संपन्न झाली. गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला 12 वर्ष पूर्ण झालीत तोच कालावधी या आपल्या संघटनेचा आहे, आजही विद्यापीठ स्तरावर ही संघटना मजबूत आहे, या संघटनेला अजून मजबुती आणि ताकत मिळावी या उद्देशाने आज ची ही सभा आयोजित होती, प्रत्येक तालुका सतरावरून सदस्य या सभेला उपस्थित होते. प्राध्यापकांच्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील प्रश्न सोडविण्याचे कार्य ही संघटना सतत करत असते. म्हणुन आता राज्यस्तरावरील संघटना बांधणीसाठी ची पूर्व तयारी करण्यासाठी या सभेचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यानी चंद्रपूर येथे केले होते, विविध प्रश्नांवर विचार विनिमय झाले. संघटनेला जिल्हा व तालुका स्तरावर बळकटी मिळावी म्हणुन जिल्हा व तालुका स्तरावरील संघटन होणे गरजेचे आहे असाही सुर होता, संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य या सभेला उपस्थित होते. संघटनेचे सचिव डॉ प्रमोद शंभरकर यानी सभेला संबोधित करत विश्वास दिला की आपली संघटना कुठेही विकली जाणार नाही, अन्याया पुढे झुकणार नाही आणि न्याय मिळवल्या शिवाय शांत राहणार नाही.
येत्या डिसेंबर मधे दोन दिवसीय अधिवेशन गोंडवाना विद्यापीठ व डॉ बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने चंद्रपूर येथे आयोजीत करण्याचा निर्णय घेण्यात आला, यामध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून प्राध्यापक उपस्थीत राहावेत असे आव्हान संघटनेचे अध्यक्ष मा. डॉ. पेटकर आपले अध्यक्षीय मत व्यक्त करतांना सांगितले.
विद्यापीठ स्तरावरील वेगवेगळे प्रश्न सोडविण्याचे कार्य सतत सूरू रहावे या हेतूने सर्व सदस्य पदाधिकारी यानी कार्य करावे असेही मत व्यक्त करण्यात आले
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.