Star VCM न्युज :-
चंद्रपूर :-
मागील बारा दिवसापासून चंद्रपूर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मागील 12 दिवसापासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यामुळे रुग्णालयात आय सी यु मध्ये हलवण्यात आले.
परंतु त्यांनी उपोषण स्थळावरून जाताना माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील त्यांनी माध्यमातून भूमिका जाहीर केली. त्यांच्या जागी आज आमरण उपोषण विजयराव बल्की यांनी सुरू केले आहे.
या संदर्भात ओबीसी संघटनेच्या वतीने निर्णायक बैठक मातोश्री सभागृहात पार पडली त्यात विविध आंदोलनाच्या भूमिका कशात तीव्र केल्या जातील संदर्भात चर्चा करण्यात आली.
आता ओबीसी समाजाला तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
11 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या अन्न त्या आंदोलनाचा शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.शासनाच्या निषेधार्थ ओबीसी बांधवांनी रवींद्र टोंगे यांच्या समर्थनात तीव्र आदोलनाची भूमिका घेतली आहे.
उद्या शनिवारला बारा वाजता जनता कॉलेज चौक येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
सोमवार दिनांक 24 ला जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्टिय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष,
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार यांच्या घरासमोर उपोषण मंडपापासून (अंतयात्रा)तिरडी यात्रा काढण्यात येणार आहे.
25 तारखेला तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. एवढेच नाही तर शासनाने यावरही भूमिका स्पष्ट केली नाही तर. संपूर्ण चंद्रपूर जिल्हा बंद करण्याचा निर्णय ओबीसी संघटनाकडून घेण्यात आला आहे.
जोपर्यंत सरकार आपली भूमिका ओबीसी आरक्षणाची भूमिका स्पष्ट करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असाही निर्णय घेण्यात आला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.