मौजा नवरगाव तह सिंदेवाही येथील भु क्र 19 या सरकारी जागेतून श्री धर्मानंद नागदेवते आणि लता नागदेवते यांना त्यांची जागा मौजा रत्नपुर भु क्र 983/1 या जागेमध्ये जाण्यासाठी रस्ता देण्यात येऊ नये यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मा तहसीलदार साहेब सिंदेवाही यांना निवेदन दिले आहे,
राजु भैसारे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझेवर केलेल्या आरोपांचे खंडण करणे व श्री राजु भैसारे यांच्या बेकायदेशीर कृत्याचा खुलासा
माझी नम्र विनंती याप्रमाणे आहे कि,
मी मौजा नवरगाव, तह. सिंदेवाही येथील रहिवाशी असून नवरगाव ग्रामपंचायतचा सरपंच आहे. मौजा नवरगाव येथील भु. क. १९ या सरकारी जागेतुन श्री धर्मानंद नागदेवते, लता नागदेवते यांना त्यांची जागा मौजा रत्नापूर भु. क्र. ९८३/१ या जागेमध्ये जाण्यासाठी रस्ता देण्यात येऊ नये यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मा. तहसिलदार साहेब सिंदेवाही यांना निवेदन दिले होते. नागदेवते यांची जागा श्री राजु भैसारे यांनी विकत घेतली व तिथे ते अकृषक निवासी भुखंड पाडुन व्यवसाय करीत आहेत. परंतु आम्ही दिलेल्या निवेदनामुळे त्यांच्या जागेमध्ये जाण्यासाठी जो हंगामी कच्चा रस्ता मा नायब तहसिलदार सिंदेवाही यांनी मंजुर केला होता तो रस्ता नामंजुर करण्यात आला होता. त्यामुळे श्री राजु भैसारे यांनी सुद्धभावनेतुन पत्रकार परिषद घेऊन माझेवर बिनबुळाचे आधारहिन आरोप केले आहेत व विविध वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रकाशीत करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकरणाची वास्तवता खालीलप्रमाणे आहे. या संपूर्ण
मौजा रत्नापुर सर्वे नं. ९८३ / १ या शेत जमिनीचे मुळ मालक धर्मानंद देवेन्द्र नागदेवते व लता देवेन्द्र नागदेवते हे होते. त्यांनी दि. १२/१०/२०२२ रोजी मा. नायब तहसिलदार सिन्देवाही, यांचेकडे शेत जमिनीमध्ये पिक घेण्यासाठी जाणे येण्या करिता रस्ता नसल्याचे कारण सांगुन मौजा नवरगांव भु.
सिंदेवाही यांनी दि. २७/१२/२०२२ रोजीचा आदेश हा पारीत तारखेपासुनच T बेकायदेशीर आहे हे स्पष्ट होते.
यांनी
रद्द केला होता.
वर नमुद रा.मा.क. १/ एल एन ए-११/२०२२/२३ मौजा रत्नापूर या प्रकरणात मा. नायब तहसिलदार सिंदेवाही यांचा दि. २७/१२/२०२२ रोजीचा बेकायदेशीर आदेशाचा श्री राजु भैसारे हे गैरफायदा घेऊन त्याच्या * ले-ऑऊटसाठी आवश्यक मंजुरी मिळविण्याचा तसेच भु. क. १९ या जागेच्या मधोमध उत्तर-दक्षिण ९ मिटर रूंदीचा पक्का रस्ता तयार करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करीत आहे. श्री राजु भैसारे यांचा संपूर्ण भु. क. १९ ची जागा बेकायदेशीर रित्या हडप करण्याचा मानस आहे असे दिसुन येते. याच मौजा नवरगाव येथील भु. क. १९ च्या जागेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग सिन्देवाही मार्फत शासकिय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेही रा.मा.क. १/एल एन ए-११ / २०२२/२३ मौजा रत्नापूर या प्रकरणात मा. नायब तहसिलदार सिंदेवाही यांचा दि. २७/१२/२०२२ रोजीचा आदेश, त्यात नमुद शर्तीनुसार, निष्कीय झालेला आहे. सदर शासकिय कामाशी माझा किंवा ग्रामपंचायत नवरगांवचा काहीही संबध नाही. तसेच मौजा नवरगाव भु. क. १९ ची ही एकमेव सरकारी जागा मौजा नवरगावला उपलब्ध आहे. या जागेचा सार्वजनीक हिताच्या दृष्टीने शासकीय योजनांसाठी वापर करणे आवश्यक आहे. अशा सरकारी जागेतुन खाजगी व्यक्तीला तिच्या वयक्तीक स्वार्थासाठी रस्ता देण्याची तरतुद कुठेही नाही किंवा असा रस्ता देता येत नाही..
सदर जागेवर जाऊन ग्राम सदस्य आणि स्वतः सरपंच राहुल फोडणे यांनी पाहणी करण्यात आली आणि गावातले नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जमा होते
राजू भैसारे यांनी पत्रकार परिषद घेऊन जे आरोप सरपंच राहुल फोडणे यांच्यावर केले ते पूर्णपणे बिन बुडाचे आहे असा कुठलाही व्यवहार त्यांनी केला नाही याचा खंडन आज पत्रकार परिषद मध्ये सरपंच राहुल फोडणे यांनी केलेला आहे आणि राजू भैसावे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकून त्यांची नार्कोटेस करण्यात यावी हे सुद्धा यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले