चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुका येथील बेलगाव व श्रीनगर ग्रामपंचायत खोकरी येथील मदतनीस पदासाठी अर्ज करण्यात आले होते. त्या अर्जात स्थानिक महिलांनी
मदतनीस पदाकरता अर्ज केले होते. मात्र बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना भद्रावती येथील अधिकाऱ्यांनी नियमाला डालून पद भरती केल्याचा आरोप कल्पना बाविस्कर, आणि प्रियंका वांढरे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
मदतनीस या पदासाठी बाल विकास अधिकारी यांच्याकडून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या या पदभरतीत स्थानिका व अन्याय झाला असून बाहेर राहत असलेल्या महिलांना पात्र करण्यात आले. असा गंभीर आरोप करण्यात आला.
सौ. स्नेहा तुळणकर हिचे लग्न काही वर्षांपूर्वीच झाले असल्याने तिचे आधार कार्ड आणि बेलगाव येथील सरपंच सौ. भारती सुनील आगलावे यांनी तिला चुकीचा रहिवासीचा दाखला देण्यात आला. शासनाच्या नियमानुसार रहिवासी दाखला देण्याचा अधिकार आता ग्रामपंचायतला राहिलेला नसताना. येथील सरपंचांनी कशाच्या आधारावर रहिवासी दाखला दिला वर प्रश्न उपस्थित केला. सदर दाखला हा आधार कार्डच्या लिंकनुसार काढला जात असतो. मात्र येथील सरपंचाने नियम धाब्यावर बसून सरास नियमाचे उल्लंघन केल्याचे आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला. संबंधित महिलाचे मतदान यादीत तिच्या नावे चा उल्लेख नाही .ती सध्या कायमस्वरूपी रहिवासी राहणार शिरपूर लोहारा. तालुका उमरेड येथील कायमस्वरूपी रहिवासी आहे. एवढे सर्व पुरावे असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारावर मदतनीस पदासाठी पात्र ठरवले.
सौ. उषा गंधारे रा. घोसरी या महिलेचा सर्व कागदपत्रांची शहानिशा करावी. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात 15 ला तारखेला महिलाला घेऊन आमरण उपोषण सदर कार्यालयासमोर करण्यात येईल. अशी माहिती पत्रकार परिषदेतून अमोल आत्राम, रुपेश वांढरे, प्रियंका वांढरे, कल्पना बाविस्कर, यांनी पत्रकार परिषदेतून दिली.