star VCM न्यूज़
चंद्रपुर
स्थानीय माता नगर वार्ड चंद्रपूर येथील रहिवासी प्रवीण गुरफुडे यांचा १२ वर्षांचा मुलगा प्रेम हा ब्लड कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त आहे, प्रेम हा जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे भरती आहे, त्याचा उपचार तिथेच सुरू आहे, प्रेम व त्याच्या आई-वडिलांना सहा महिने जामठा येथेच किरायाने घर घेऊन राहायचं आहे , कारण त्याला दोन-तीन दिवसात कधीही चेकअपसाठी न्यावं लागेल.
त्यांच्या आई-वडिलांकडे जितके पैसे होते ते औषधी व उपचारावर खर्च झाले आता समोर पुन्हा अनेक प्रकारचे चाचणी व औषधी बाकी आहे. प्रेम च्या आजाराची सूचना प्रेम च्या आजीने नटराज डान्स इन्स्टिट्यूट चे प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते अब्दुल जावेद यांना दिली त्यांनी त्यांना मदतीचा आश्वासन दिला
आणि अब्दुल जावेद यांनी मदतीकरिता आपल्या विद्यार्थी, मित्र व संबंधितांना मेसेज द्वारे प्रेम च्या आजाराबाबत कळविले अवघ्या पाच दिवसात अब्दुल जावेद यांच्याकडून व जनतेद्वारा एकत्रित झालेली एकूण राशी पन्नास हजार चारशे रुपये प्रेम ची आई व त्याचे आजोबा यांच्या हाती दिली.
ज्यांनी प्रेम करिता मदतीचा हात दिला त्यांचा अब्दुल जावेद यांनी आभार व्यक्त केला तसेच प्रेम करिता सुरू असलेला मदतीचा हा अभियान पुढेही सुरू राहणार असा त्यांनी आश्वासन दिला