Star VCM न्यूज़
चंद्रपुर:–
प्रा. लि. (पेटी कंत्राटदार) या कंपनीकडे कार्यरत असतांना दि. १६ मार्च २०२३ पासुन या सर्व कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता सुरु असलेल्या कामावरून अचानक बंद करण्यात आले आहे. पाईप कन्व्हेअर बेल्टवरील कामगार यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सुरू असले काम अचानक बंद केलेल्या कारणामुळे मागील चार महिण्यापेक्षा जास्तीचा कालावधी झाला असून सर्व कामगार तसेच कामगारांच्या संपूर्ण परिवारावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
संबंधीत कंत्राट चे नुतनीकरण (वर्क ऑर्डर) अद्यापपर्यंत कुठलाही तोडगा निघाले नसल्याने. वारंवार प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा या कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे. मागील सहा महिन्यापासून कंपनीने कुठलीही सूचना न देता कामावरून काढल्यामुळे त्यांना अखेर आज मेजर गेट समोर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.
वारंवार या संदर्भात संदर्भात संघटनेच्या वतीने सतत व्यवस्थापनाशी चचा पत्र व्यवहार व पाठपुरावा करून सुध्दा हा प्रश्न निकाली लावण्यात सि.एस.टी. पी. एस. प्रशासनाकडून सातत्याने अपयश प्राप्त झाले आहे. पाइप कन्यूअर बेल्ट येथील कामगार याच्या मनामध्ये प्रचलीत व्यवस्थेबाबत चिन्ह निर्माण झालेला आहे .तसेच वरिल विषयाला अनुसरून पाईप कन्हेअर बेल्ट येथील कामगारांमध्ये आकोश असतोष निर्माण झालेला आहे.
या कामगाराच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तीव्र आंदोलन करण्यात करण्यात येऊन शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल अशी माहिती संघटनेच्या वतीने निलेश बेलखडे बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेना सचिव, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ , यांनी दिली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ गि-हे,माजी महानगर प्रमुख प्रमोद पाटील,विकास चहारे, निलेश बेलखडे बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेना सचिव, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ , पी टी पी एस च्या धोरणाच्या निषरधात उपोषण बसलेले . सेनेचे कामगार 9/ 8/20 23 पासून संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाला मेजर गेट येथे कंत्राटी कामगार गजानन दुरोडकर ,संतोष थेटे उपोषणाला बसल्याचे बसले आहेत.
उपोषण धारकांना त्यांच्या प्रकृतीस बिघाड झाल्यास अन्यथा खालावल्यास अथवा कुठलीही दुर्घटना झाल्यास हा घटनेस प्रशासन व सी एस टी पी एस प्रशासन व सी एच पी प्रमुख विभाग कारणीभूत राहील. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल सागोरे, प्रमोद कोल्हार कर, विक्रम जोगी, अमोल भट ,राजकुमार हजारे, पंकज इंगोले, अक्षय मेश्राम,. श्रीकृष्ण ताजणे, शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.