महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली जिल्हयामध्ये कारखान्याचे घेण्यात आलेल्या वायू व जल प्रदूषणाचे नमूने यामध्ये खूप मोठया प्रमाणात फेरबदल केला असल्यामुळे उच्च स्तरीय चौकशी करा अशी मागणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी केली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत कारखान्यामुळे होणारे जल प्रदूषण व नदी, नाले व वायू प्रदूषणाचे नमूने घेण्यात आलेल्या नमुन्यात व त्यांचे रिझल्ट आकडेवारीत मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आला. त्यामुळे म.प्र.नि.मंडळ प्रयोगशाळा व प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव सन 2024 पासून कार्यरत झाले त्यावेळेपासून चंद्रपूर यवतमाळ व गडचिरोली जिल्हयात खूप मोठ्या प्रमाणात घातक जल व वायू प्रदूषण वाढलेला आहे व प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव यांनी शासनाची दिशाभूल करणारे अहवाल सादर केलेले आहे.म.प्र.नि.मंडळ चंद्रपूर कार्यालया अंतर्गत कारखान्यातून निघणारा रासायनिक धूळ यां’चे नमूने घेतले असल्यास त्या आकडेवारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आला. ज्या प्रयोगशाळेमध्ये नमुन्याची तपासणी करण्यात आली त्या प्रयोगशाळेचे अधिकारी व प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव यांनी पदाचा दुरूपयोग करून कारखानदाराची पाठराखन करणारा अहवाल देऊन शासनाची दिशाभूल केलेली आहे.म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालय श्री. तानाजी यादव व क्षेत्राधिकारी श्री. नंदकिशोर लोमटे व श्री. स्वप्नील लिगळे यांनी मौका पाहणी अहवाल व कारणे दाखवा नोटीस खोटे सादर केले असल्यामुळे यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करून निल बनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी केली आहे
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.



