Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

अतिक्रमण करुन अवैध बांधकाम करणार्‍याविरुध्द कारवाईची मागणी.

> यशवंत टिपले यांची पत्रपरिषदेत मागणी.

चंद्रपुर महानगर पालिका विरोधात अष्टविनायक अपार्टमेंट गृह निर्माण सहकारी संस्था आंदोलनाच्या तयारीत.

आष्टविनायक अपार्टमेंट गृह निर्माण सहकारी संस्थाच्या जागेवर अतीक्रमण करुन बांधकामामुळे फ्लैट धारका मधे प्रचंड रोष.

चंद्रपूर

येथील रयतवारी कॉलरी मार्गावर असलेल्या शासकिय दुध डेअरी जवळील प्लॉट नं. ४ व प्लॉट नं. ६ हे दोन्ही अष्टविनायक अपार्टमेंट गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या नावावर आहे. त्यापैकी प्लॉट क्र. ६ यावर बबन समर्थ नावाच्या व्यक्तीने अतिक्रमण केले असून कोणाचीही परवानगी न घेता त्यावर बांधकाम सुरु केले आहे. सदरचे प्रकरण चंद्रपूर कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. त्यानंतर यासंदर्भात मनपाच्या झोन क्र. ३ बंगाली कॅम्प येथील उपायुक्त पंचबुध्दे व सभापती यादव यांना सदरच्या प्लॉटचे कागदपत्र दाखवूनही ’त्या’ व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे समर्थ पितापुत्राचे बांधकाम बिनबोभाट सुरु असून प्रशासनाने या अवैध बांधकामावर बुलडोझर चालवावा. व बाकीचे काम बंद पाडावे अशी मागणी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे सभासद यशवंत टिपले यांनी पत्रपरिषदेत केली आहे.
शासकिय दुध डेअरीजवळ गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या नावावर प्लॉट क्र. ४ व प्लॉट क्र. ६ असे दोन प्लॉट आहे. त्याची कागदपत्रेही संस्थेकडे आहेत. असे असतांनाही बबन समर्थ त्यांचा मुलगा संजोग समर्थ यांनी प्लॉट क्र. ६ वर अनधिकृतपणे अतिक्रमण करुन बांधकाम सुरु केले. याबाबत सर्वप्रथम गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी महानगरपालिका झोन क्र. ३ बंगाली कॅम्पचे उपायुक्त पंचबुध्दे व सभापती यादव यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. व प्लॉटचे कागदपत्रही दाखविले. परंतू या दोघांनाही समर्थ पितापुत्रावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संस्थेच्या सभासदांनी नगरसेविका जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला. जयस्वाल यांनी पंचबुध्दे व यादव या दोघांनाही फोन लावला असता दोघांनीही प्रतिसाद दिला नाही. १९ मे रोजी सोसायटीच्या सर्व सभासदांना महापौर खांडेकर यांनी कार्यालयात बोलविले. त्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष राहूल पावडे यांनाही कार्यालयात बोलविण्यात आले. या ठिकाणी राहूल पावडे यांना सविस्तर माहिती देण्यात आली व त्यांना कागदपत्रेही दाखविण्यात आली. राहूल पावडे यांनी त्यानंतर पंचबुध्दे व नगर रचनाकार भोयर यांना बोलवून त्यांना सदर कागदपत्रे दाखविली. परंतू तरीही पंचबुध्दे व यांनी समर्थ यांना बांधकाम थांबविण्यास सांगितले नाही किंवा कोणतीही नोटीस दिली नाही. याबाबत मनपा आयुक्तांनाही भेटून पत्र दिले परंतू अजुनाही अतिक्रमणधारी समर्थ पितापुत्रावर कोणतीही कारवाई झाली नाही. प्रशासनाने आमची अडचण लक्षात घेऊन त्वरित अवैध बांधकाम थांबवावे अशी मागणी यशवंत टिपले यांनी पत्रपरिषदेत केली आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version