चंद्रपूरः- सरदार पटेल महाविद्यालयांतर्गत कार्यरत आरोग्य दक्षता समिती आणि श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रकृती परीक्षण शिबिर पार पडले. आयुष मंत्रालयाच्या ‘देश का प्रकृती परीक्षण’ या अभियानांतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रकृती चाचणी ही आयुर्वेदातील एक महत्त्वाची पद्धत आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या स्वभावाचे किंवा स्वभावाचे मूल्यांकन केले जाते. या चाचणीमध्ये विविध प्रमुख घटक आणि दोष (वात, पित्त, कफ) यांचे संतुलन मोजले जाते. त्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रवृत्ती कशा आहेत हे जाणून घेण्यास मदत होते. प्रकृती चाचण्याद्वारे वैद्य व्यक्तीला वैयक्तिक आहार, जीवनशैली आणि वैद्यकीय सल्ले देऊ शकतो. ज्यामुळे त्याचे आरोग्य टिकवून ठेवता येते आणि संतुलित राहते. श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. संदेश गोजे, डॉ. खुशाल डाहुले, डॉ. अनंत खीरटकर यांच्या नेतृत्वाखाली २५ डॉक्टरांच्या पथकाने प्रकृती परीक्षण मोबाईल अॅपद्वारे सरदार पटेल महाविद्यालयातील विविध विभागातील ९६ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे प्रकृती विश्लेषण केले. या वैद्यकीय शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराचे समन्वयन आरोग्य दक्षता समितीचे प्रमुख डॉ. सतीश कन्नाके यांनी केले, तर समितीचे सदस्य डॉ. सुनिता बनसोड, डॉ. सपना वेगीनवार, डॉ. उषा खंडाळे, प्रा. सुनील चिकटे, प्रा. अमोल कुटेमाटे, डॉ. आशा सोनी, भारत आवळे, सुमित पेटकुले, निखील मोसमवार, विनोद जुमडे, गजानन पंदीले, अनिल पारशीवे यांनी सहकार्य केले.दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.