Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे दिनांक 2 ऑक्टोबरला वर्धापन दिन समारंभात वेगवेगळे उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली . या वर्धापन दिन समारंभात सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके यांना 2023- 24 यावर्षीचा उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार प्राप्त झाले . कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयातील सीनियर अंडर ऑफिसर उज्वल बाजूरकर 2018, सिनिअर अंडर ऑफिसर निलेश अधिकारी 2020, आणि सीनियर अंडर ऑफिसर नाजुका कुसराम 2021 यांनी दिल्ली येथे 26 जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त होणाऱ्या राजपथ तथा पंतप्रधान रॅली येथे पथसंचालन करून महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले होते . तर बरेच विद्यार्थी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, इंडियन आर्मी, पॅरामिलिटरी, पोलीस भरती, अग्निवीर तथा विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना यावर्षीचा उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार अमरावती विदयापीठचे कुलगुरू डाँ. मिलिंद बाराहते यांच्या हस्ते प्राप्त झालेले आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन समारंभात यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट्स मानकरी महाविद्यालयातील सीनियर अंडर ऑफिसर समीक्षा आंबटकर हिला प्राप्त झाले आहे समीक्षा हिने निलगिरी ट्रेकिंग कॅम्प आर्मी अटॅचमेंट कॅम्प आणि प्रीआरडीसी कॅम्प पुणे येथे झालेल्या इंटर ग्रुप आर डी सी मध्ये शेवटच्या फेरीपर्यंत सहभाग घेतला होता. याकरिता सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष श्री किशोरभाऊ जोरगेवार, सचिव श्री प्रशांत भाऊ पोटदुखे, सहसचिव श्री कितीवर्धन दीक्षित सर यांनी कॅप्टन डॉक्टर सतीश कन्नाके यांचे कौतुक करून भरभरून शुभेच्छा दिल्या.सरदार पटेल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माध्यमशेट्टीवर, एनसीसी विभाग प्रमुख मुलींचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट कांचन रामटेके सर्व प्राध्यापक वृंद आणि कॅडेट्सनी कॅप्टन डॉ.सतीश कन्नाके सरांना आणि सिनिअर अंडर ऑफिसर समीक्षा आंबटकर ला खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Share.

Leave A Reply

Exit mobile version