अम्मा टिफिन देत केले महाकाली नगरी चंद्रपूरात स्वागत*आज राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे चंद्रपूर दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे स्वागत करत श्री माता महाकाली महोत्सवाचे निमंत्रण दिले. सोबतच यावेळी त्यांनी महामहिम यांना अम्मा का टिफिन भेट स्वरुप दिला.
राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे आज चंद्रपूर दौ-यावर आहे. यावेळी विश्राम गृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेतली.
तसेच माता महाकाली नगरीत स्वागत केले. चंद्रपूरात श्री माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार या महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. दरम्यान आज राज्यपाल चंद्रपूरात होते.
यावेळी माता महाकाली महोत्सवाचे निमंत्रण आणि माता महाकालीची मूर्ती राज्यपाल यांना दिली. चंद्रपूरात सुरु असलेल्या अम्मा का टिफिन उपक्रमाबाबतही त्यांनी राज्यपाल यांना माहिती देत अम्मा का टिफिन भेट स्वरुपात दिला.