परी क्रिएटिव्ह ग्रुप,चंद्रपूर चा शीतला माता मंदिर ,चंद्रपूर येथे महाराष्ट्रीयन 12 सणांचा लाईव्ह प्रोग्राम मधे सुमारे 62परी सदस्यांनी भाग घेतला होता.विशेष अतिथी म्हणून प्रतिनिधि स्टार महाराष्ट्र चे श्री विकास मोरेवार यांची उपस्थिती होतीपरी ग्रुप तर्फे मोमेंटो देऊनविकास मोरेवार यांचा सत्कार करण्यात आला.वैशाली फुलकर यांनी निवेदन खूप छान केले.या उत्सवामधे एकूण 12 सणांचे देखावे आणि प्रत्यक्ष सण उत्सव सर्व परी सदस्यांनी सादर केले.शीतला माता मंदिर चे ग्राउंड ची सुरेख रंगांची सजावट करण्यात आली होती.गुढीपाडवा,वटपौर्णिमा,आषाढी एकादशी,मंगळागौर,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी,गणपती,महालक्ष्मी,दुर्गादेवी,दिवाळी,मकर संक्रांती,होळी असे हे 12सण समारंभ उत्कृष्ट रित्या सादर करण्यात आले,काही परी नौकरी करणाऱ्या असूनही वेळ काढून या उत्सवाची त्यांनी प्रॅक्टीस केली,परींचा उत्साह कुठेच कमी नव्हता,खूपच सुदंर सर्वांची तयारी,त्या त्या सणांची उत्कृष्ट सजावट,आणि परींचीस्वतःची तयारी अगदी बघण्यासारखी होती.या सर्व सहभागी 62 परिंना परी ग्रुप तर्फे बक्षिसे देण्यात आली.परींचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम अतिशय सुरेख आणि उत्कृष्ट करण्याकरिता सर्व सहभागी परी आणि मंदा कोपुलवार,गीता डांगरे,रूपा मुत्त्यालवार,किरण पतरंगे,अशोक कोठारी साहेब यांनी विशेष सहकार्य केले.