Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

इंफिनाईट फाऊंडेशनघुग्गुसमध्ये राहणाऱ्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उ‌द्देशाने, लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशनने विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे.लॉयड्स मेटल्स आणि लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशनचा अग्रणी प्रकल्प म्हणजे जी डी गोएंका लॉयड्स पब्लिक स्कूलची स्थापना स्थानिक मुलांना परिपूर्ण शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली ही शाळा नवे तंत्र आणि उत्तम पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशी आहे.लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशनने स्थानिक सरकारी शाळांच्या विकासा कडेसुद्धा लक्ष दिले आहे. स्थानिक जिल्हा परिषद शाळांमध्ये पायाभूत सुविधा उभारणे, सुधारणा करणे, या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यां ना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, ही सर्व कामे लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशनने केली आहेत. स्थानिक खेड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण मिळावे यासाठी लॉयड्सने शिष्यवृत्ती प्रक्रिया सुद्धा स्थापित केली.लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशनच्या कार्यात भागीदार असलेल्या लाइफ ऑफ लाईट ट्रस्ट या एनजीओच्या सहकार्याने सध्या घुग्गुस, पडोली आणि पांढरकवडा येथील तीन शाळांमधील विद्या र्थी आणि शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरु आहेत. त्यामुळे शिक्षण देण्याचा आणि घेण्याचा दर्जा वाढविण्यास मदत होते. लॉयड्सच्या आनंदो शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रियदर्शनी कन्याविद्यालय, घुगुस, न्यू इंग्लिश हायस्कूल, पांढरकवडा, आणि इंदिरा गांधी विद्यालय, पडोळी या शाळांमधील एकूण 756 विद्यार्थी आणि 46 शिक्षक कर्मचाऱ्यांनी शिक्षक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, महाचर्चा कार्यक्रम, करिअर मार्गदर्शन सत्र, गणित आणि इंग्रजी चे प्रशिक्षण वर्ग, तसेच शैक्षणिक वितरण अशा विविध उपक्रमांचा लाभ घेतला आहे. या शाळांमध्ये साहित्य आणि गणवेश यांचे वितरण करणे, आणि विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा उभारणे या सारखी कामे लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेली आहेत.शैक्षणिक विकासाच्या बाबतीत लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशनचा एक बहुआयामी दृष्टी कोन आहे. या मुळे केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यावरच त्यांचे लक्ष केंद्रित झालेले नाही तर वि‌द्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लॉयड्सचे लक्ष आहे. या मुळे वि‌द्यार्थी स्वतःची उन्नती करून नवीन ध्येये गाठू शकतील, आणि स्वतःची भरभराट करू शकतील.

Share.

Leave A Reply

Exit mobile version