Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार नाईट कॉलेज चंद्रपूर, सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर, राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई आणि असोसिएशन ऑफ ऑल कॉम्प्युटर सायन्स टीचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते झाले आहे. जेटपुरा गेटजवळील डॉ. शमाप्रसाद मुखर्जी सभागृहात ही कार्यशाळा 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.. डॉ. प्रशांत बोकारे (कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), डॉ. अजय कुशवाह (नोएडा), कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. मा.राजेश्वर सुरावर (श्री माता कन्या सेवा संस्था चंद्रपूर) यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होणार आहे. डॉ. पी. एम. काटकर (प्राचार्य, सरदार पटेल कॉलेज, चंद्रपूर) आणि संतोष शिंदे (प्रभारी प्राचार्य, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार नाईट कॉलेज चंद्रपूर) हे कार्यशाळेचे प्रमुख आयोजक आहेत. या कार्यशाळेत तीन सत्र आयोजित करण्यात येणार आहे ज्यात नवीन संशोधन पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि वाङ्मय चौर्य होऊ न देण्याकरिता उपाययोजना यावर मार्गदर्शन डॉ. अजय कुशवाहा, श्री. जयंत बेलवाडी आणि डॉ. सौम्या राणी करणार आहेत.कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश पी. इंगोले (केंद्र संचालक, एसएनडीटी, बल्लारपूर), डॉ. श्रीराम कावळे (प्रभारी कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), डॉ. अनिल बोरगमवार (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय प्रतिष्ठान), डॉ. आभा खंडेलवाल (संस्थापक असोसिएशन ऑफ ऑल कॉम्प्युटर सायन्स टीचर्स, नागपूर), डॉ. दिनेश गभणे (प्राचार्य राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई) आदी उपस्थित राहणार आहेत.आयोजित कार्यशाळेत आपण नोंदणी करावी असे स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय चंद्रपूर यांनी सर्व शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. कार्यशाळेत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://tinyurl.com/IRMPPT2K24 या लिंक वापर करावा.

Share.

Leave A Reply

Exit mobile version