Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

चंद्रपूर, ३ जानेवारी २०२४ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आयोजन समिती, चंद्रपूर, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले महिला मंडळ, नगिनाबाग, चंद्रपूर, नगिनाबाग माळी समाज युवा मंच, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती सोहळा व प्रबोधन मेळावा दि. १ ते ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले चौक पटांगण, सवारी बंगला, नागिनबाग, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला.

यानिमित्त चंद्रपूर शहरातून जटपुरा गेट ते गांधी चौक, गांधी चौक ते नगीना बाग इथपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला, पुरुष, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत शहरातील मुख्य रस्त्यांवरून मिरवली.

शोभायात्रेनंतर सवारी बंगला येथे प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, ओबीसी नेते, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा २०२४ निवडणुकीतील बहुजनांचे प्रतिनिधी राजेश बेले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगीनाबाग सवारी बंगला येथे असलेल्या फुले दांपत्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राजेश बेले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले या एक महान क्रांतिकारी आणि समाजसुधारक होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजात त्यांचे स्थान उंचावण्यासाठी मोलाचे कार्य केले.

बेले म्हणाले की, आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा स्मरण करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प करावा. आपण त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असेही ते म्हणाले.

या मेळाव्यात बोलतांना शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Share.

Leave A Reply

Exit mobile version