चंद्रपूर दिनांक 26,27 डिसेंबर 2023 ला जनता महाविद्यालय तर्फे दोन दिवसीय परिषदेमध्ये कू. वैष्णवी हल्करे व डॉ प्रकाश बोरकर यांनी ~~“`Investigating contagiouspathogens SLT spitting – A Report on chandrapur~~“` या विषयावर संशोधन करून चंद्रपूर क्षेत्रातील पब्लिक प्लेस मध्ये तोंडातील खर्रा, तंबाखू, पान थुंकी कुठेही थुकण्या मुळे आजार पसारण्यासाठी कसे कारणीभूत आहेत. ते त्यांनी त्यांच्या संशोधनातून सांगितले, करोना काळामध्ये संसर्गजण्य रोग प्रसार कमी होता.
सूक्ष्म जीवशास्त्र संशोधन केंद्र सरदार पटेल येथे संशोधनं करून या विषयावर आपले संशोधन सादर केले. त्या बद्दल त्यांना या परिषदेमध्ये द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.
डॉ प्रकाश बोरकर यांच्या मार्गदर्शनात केलेले संशोधन समाज हिताचे असल्याचे मत परीक्षकांनी केले. स्वतः वैष्णवी हिने या संशोधनासाठी मेहनत घेउन हे संशोधनं पूर्ण केले.
वैष्णवी व डॉ प्रकाश बोरकर यांचे सर्वांनी अभिनंदन केले.