Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

आज दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी आपले महाराष्ट्र राज्य चे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री सुधीरभाऊं मुनगंटीवार साहेब यांना महावितरण च्या कणा म्हटल्या जाणाऱ्या लाईनस्टाफ लाईनमन यांनी आपल्या समस्या मांडत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचे निवेदन चंद्रपूर येथील नियोजन भवन ला प्रत्यक्ष प्रचंड संख्येने उपस्थित राहून दिले आणि सविस्तर चर्चा सुद्धा केली।

महाराष्ट्र मधील वीज पुरवठा करणारी एशिया खंडांतील सर्वात मोठी कंपनी म्हणजे महावितरण। महावितरण आपल्या महाराष्ट्र मधील अति दुर्गम भागातील लोकांना वीज पुरवठा देण्याचे कार्य करते। आणि

*हे महत्वाचे कार्य करणाऱ्या लाईनमन लाईनस्टाफ ला महावितरण प्रशासन चपराशी च्या ग्रेड मध्ये ठेवून अन्याय करीत आहे। कारण महावितरण मध्ये लाईनमन लाईनस्टाफ हा एक शिकलेला ITI केलेला कुशल कामगार म्हणून  घेतल्या जाते परंतु त्याला वर्ग 4 मधील चपराशी च्या ग्रेड मध्ये ठेवण्यात आले आहे।*

त्यामुळे महाराष्ट्र मधील सर्व लाईनस्टाफ यांनी धुळे येथे 1 ऑक्टोबर ला महामेळावा घेतला त्यात जवळपास 10 हजार लाईनस्टाफ उपस्थित होते।

तिथे सर्वांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय वर आक्रोश व्यक्त केला आणि तिथे या मेळाव्याला सर्व महावितरण मध्ये कार्यरत 27 संघटना ना निमंत्रित करणयात आले होते पण  लाईनस्टाफ च्या हिताचे विचार करणारे फक्त 9 संघटना आल्या होते त्यांनी एकमत करून *महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समिती* स्थापन करणयात आली

आणि प्रशासन ला कृती समितीने आंदोलनाचा इशारा देऊन निवेदन देत लाईनस्टाफ च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती केली परंतु प्रशासन ने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून  16 ऑक्टोबर 2023  ला  सविस्तर आंदोलन ची नोटीस देण्यात आली.
त्या नोटीस प्रमाणे 20 ऑक्टोबर 2023 ला महावितरण च्या सर्व मंडळ कार्यालय समोर द्वार सभा घेण्यात आली आणि या द्वार सभेला लाईनस्टाफ आणि उस्फूर्त प्रतिसाद दिले ।

त्याच प्रमाणे चंद्रपूर आणि महाराष्ट्र मधील अति दुर्गम भाग गडचिरोली येथे सुद्धा प्रचंड संख्येने लाईनस्टाफ यांनी द्वार सभेला उपस्थिती देऊन आपले आक्रोश व्यक्त केले।

यापुढे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये
*महावितरण चा कणा खाकी रक्षक लाईनस्टाफ*
*क्रमबद्ध आंदोलन सुरू असून आता शेवटच्या टप्प्यात आले आहे*
त्यानुसार खालील प्रमाणे आंदोलन सुरू आहे

*१)दि २०/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र मधील सर्व वितरण मंडळ कार्यालय समोर दुपारी १:३०ला द्वारसभा*

*२)दी २६/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र भर सर्व परिमंडळ कार्यालय समोर प्रचंड मोठ्या द्वारसभा*

*३) दि ३०/१०/२०२३ पासून सिम बंद आंदोलन*

*४) दि ६/११/२०२३ पासून वसुली बंद*

*५)१६/११/२०२३ रोजी पासून वयक्तिक वाहन वापर बंद*
*(सर्व मोटार सायकल युनिट ला उभा करून त्यास काळे झेंडे लावणे)*

*६) दि २८/११/२०२३ ते ३०/११/२०२३ ० पर्यन्त असहकार/ कामबंद आंदोलन*

*७) 11/12/2023आझाद मैदान येथे प्रचंड आक्रोश मोर्चा व १ दिवशीय धरणे आंदोलन*

*८) १२/१२/२०२३ पासून बेमुदत आमरण उपोषण संभाजी नगर येथे*

त्याच प्रमाणे महावितरण लाईनमन लाईनस्टाफ च्या प्रमुख मागण्या रास्त मागण्या आहेत।
1 महावितरण लाईनमन लाईनस्टाफ कुशल कामगार असून त्यांना चपराशी च्या वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये टाकण्यात यावे।

2 लाईनमन लाईनस्टाफ चे शहर असो की ग्रामीण कामाचे तास निश्चित करून शिफ्ट ड्युटी चार्ट प्रमाणे ड्युटी देण्यात यावी।

3 लाईनमन लाईनस्टाफ चे कामाचे स्वरूप निश्चित नसून ते निश्चित करण्यात यावे।

4 लाईनमन लाईनस्टाफ याना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी ।

5 लाईनमन लाईनस्टाफ यांना वाहन पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा कारण त्यांना आता कंपनी कामासाठी ग्राहकांच्या तक्रार निवारण करणयासाठी स्वतःच्या वाहन ने जावे लागते त्यामुळे वाहन पेट्रोल भत्ता देण्यात यावा।

6 वीज बिल वसुली हे काम सांघिक स्वरुपाचे असल्याने जवाबदारी निश्चित करण्यात यावी।

7 ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य सुरक्षित साधने आणि लाईन मेंटेनन्स चे साहित्य पुरविण्यात यावे।

8 कंत्राटी पद्धतीने नोकरभरती ना करता सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करणयात यावी।

अश्या रास्त मागण्या लाईनस्टाफ काडून महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समिती मार्फत करण्यात आलेली आहे।

या मागण्या मान्य झाल्या नाही आणि हे आंदोलन असेच सुरू राहील तर महाराष्ट्र राज्यात वीज समस्या वाढतील आणि महाराष्ट्र सुद्धा अंधारात जाण्याची भीती आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version