Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

चंद्रपूर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवाला उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर सर व सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले गेले , हा कार्यक्रम सरदार पटेल महाविद्यालय येथे सुरू असलेले गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मूल्यांकन केंद्र व करिअर कट्टा या सर्वांच्या संयुक्त विद्यमान घेण्यात आला.


यावेळी उपस्थित सर्व प्राध्यापक एनएसएस एनसीसी चे विद्यार्थी यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले व त्या उद्देशिके प्रमाणे सर्वांनी भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी शपथ घेतली आपल्या वक्तव्यात डॉक्टर काटकर सर म्हणाले की संविधान जर सर्वांनी व्यवस्थितपणे समजून घेतले तर कुठल्याही व्यक्तीला आयुष्य जगण्यासाठी कष्ट होणार नाहीत फक्त त्यांनी संविधान व्यवस्थित समजून घेतले पाहिजे व त्या अधिकाराचा आपल्या आयुष्यासाठी उपयोग करून घ्यायला पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बोरकर प्राध्यापक डॉक्टर चिमूरकर व प्राध्यापक डॉक्टर भुत्तमवार व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा देत सर्वांचे अभिनंदन केले.

Share.

Leave A Reply

Exit mobile version