Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

चंद्रपूर : जिल्ह्यातील आवरपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च न करण्याच्या कंपनीच्या धोरणाविरोधात 13 नोव्हेंबर 2023 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला.आवारपुर कंपनीच्या दत्तक गावांमध्ये आवाळपूर, नांदा, बीबी हिरापूर सांगोडा, पालगाव, नोकारी, बाखर्डी, तडोधी, भोयेगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र सन 2020 ते 2023 या सत्रामध्ये कंपनी प्रशासन सदर दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. यामुळे गावातील आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत आहे. कंपनीच्या प्रदूषण तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून अपघाताचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. याबाबत दत्तक गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी कंपनी प्रशासनाकडे विविध विकास कामांची मागणी केली.मात्र कंपनी प्रशासनाने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 13 नोव्हेंबर रोजी शिवाजी चौक नांदाफाटा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण केले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांनी मागण्यात आलेली मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version