Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

Star VCM न्यूज़
चंद्रपूर : जिल्ह्यातील मरेगाव येथील जि. आर. कृष्णा फेरो अँड अलॉय कंपनीतील कामगारांनी आज कंपनीच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी कंपनीसमोर आपल्या १० प्रमुख मागण्यांची यादी ठेवून कंपनी व्यवस्थापनला निवेदन दिले. दरम्यान, कामगार नेते राजेश बेले यांनी आज उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी कंपनीचे मालक अग्रवाल यांच्या शी चर्चा करून मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे.
आंदोलनकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनला एक आठवडा मुदत दिली आहे. जर कंपनी व्यवस्थापनने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर कामगार आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत.
आंदोलनात सहभागी असलेल्या कामगारांनी सांगितले की, कंपनी व्यवस्थापन गेल्या काही महिन्यांपासून कामगारांच्या हक्कांवर आघात करत आहे. वेतनवाढ, वेतन स्लिप मिळणे, बोनस कापण्यात येऊ नये, वैद्यकीय सुविधा मिळवणे, अतिरिक्त चार तासाचे वेतन देणे, स्थानिक कंत्राटधारकांना प्राधान्य देणे, कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणे, ऑपरेटर आणि ड्रायव्हरला कंपनीत समाविष्ट करणे, बंदीच्या काळात कामगार आणि ऑपरेटरला काढून टाकण्यात येऊ नये आणि सुट्टीच्या दिवशी काम केल्यास डबल वेतन देणे या सर्व मागण्या जायज आहेत. कंपनी व्यवस्थापनने या मागण्या मान्य करून कामगारांना न्याय दिला पाहिजे, अशी मागणी राजेश बेले यांनी केली आहे.

कामगारांच्या मागण्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • वेतन वाढ
  • वेतन स्लिप मिळणे
  • बोनस कापण्यात येऊ नये
  • वैद्यकीय सुविधा मिळवणे
  • १२ तासांचा कामकाजाचा कालावधी कमी झाल्यामुळे अतिरिक्त चार तासाचे वेतन देणे
  • परप्रांतीय कंत्राट रद्द करून स्थानिक कंत्राटधारकांना प्राधान्य देणे
  • कामावरून काढून टाकलेल्या ड्रायव्हर आणि ऑपरेटरला पुन्हा कामावर घेणे
  • ऑपरेटर आणि ड्रायव्हरला कंपनीत समाविष्ट करणे
  • बंदीच्या काळात कामगार आणि ऑपरेटरला काढून टाकण्यात येऊ नये
  • सुट्टीच्या दिवशी काम केल्यास डबल वेतन देणे
Share.

Leave A Reply

Exit mobile version