Star VCM न्युज :-
चंद्रपूर :-
भिवापूर वार्ड सुपर मार्केट येथे आज सकाळी पॅराडाईज चिकन सेंटर असलेल्या दुकानातच त्याच दुकानात काम करणाऱ्या नोकरानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
मृतक नईम रजीक शेख वय 55 वर्ष दादमलवार चंद्रपूर येथील रहिवासी असून याने आज सकाळी पॅराडाईज चिकन सेंटर मध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. हा या चिकन सेंटरमध्ये चिकन कापण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे.
चिकन सेंटर मालक अजहर अहमद शेख यांच्या मालकीची असलेले पॅरोडाइस चिकन सेंटरमध्ये दुपट्ट्याने गळफास घेऊन लटकून आल्याचे निदर्शनास येतात. पोलिसांना संबंधित माहिती कळवली कळविण्यात आले . बागला पोलीस चौकीतील पोलिसांनी या संदर्भाची चौकशी व पंचनामा करून नईम शेख यांचे प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले . पुढील तपास शहर पोलीस ठाण्याच्या बागला चौकी अंतर्गत सुरू असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले. मात्र या ठिकाणी दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने उलट सुलट चर्चे सुरू असून नेमके आत्महत्याचे कारण काय? याचा तपास पोलीस घेत आहेत.