चंद्रपूर
दिनांक 11/10/23 ला सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर व भारतीय जीवन विमा निगम च्या संयुक्त विद्यमाने, प्राचार्य डॉ पी एम काटकर यांच्या मार्गदर्शन खाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी डॉ प्रकाश बोरकर, प्रा संदेश पाथर्डे यांनी एल आय सी चे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री किशोर बांते यांच्या सोबत विचार विनिमय करून दिनांक 11 ऑक्टोबर 23 ला रोजगार मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांनी एल आय सी मधून कसे आपले करिअर सुरू करता येइल, एल आय सी एजंट ते डेव्हलपमेंट ऑफीसर पर्यंत शिक्षण घेत घेत कसे आथिर्क दृष्ट्या प्रबल व्हावे या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कला विभाग प्रमुख वरिष्ठ प्रा डॉ प्रकाश शेंडे यानी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना एल आय सी आपल्या नेहमीच सोबत असते, तसेच त्यातूनच नोकरीचा ही प्रश्न सुटू शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले.
याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्षा श्रीमती सुधाताई पोटदुखे,सचिव श्री भरत पोटदुखे,
श्री सुदर्शन निमकर उपाध्यक्ष सहसचिव डॉ किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य श्रीमती सागुनाताई तलांडी, श्री एस के रमजान, श्री राकेश पटेल, श्री जितेश पटेल, आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार, श्री संदीप गड्डमवार,श्री सुरेश पोटदुखे, श्री चंद्रशेखर वाडेगावकर, कार्याध्यक्ष श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार ,कोषाध्यक्ष श्री मनोहरराव तारकुंडे व सर्व विश्वस्त तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थांनी अभिनंदन केले.