Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने डिलिव्हरी पेशंटचा जीव धोक्यात- राजेश बेले

Star VCM न्युज :-
चंद्रपूर :-
ग्रामीण रूग्णालय बल्लारपूर जिल्हा- चंद्रपूर दि. १३/०९/२०२३ रोजी सौ. दिपा संपत पेरकर हिला डिलेवरीसाठी ग्रामीण रूग्णालय बल्लारपूर येथे भरती करण्यात आले. येथील डॉक्टरांच्या निष्काळजी पणामुळे डिलेवरी पेशन्टच्या जिवाला धोका निर्माण झाला!
सविस्तर वृत्त असे की,
सौ. दिपा सपंत पेरकर REG No. 3830, वर्षे २९ ग्रामीण रूग्णालय बल्लारपूर, दि. १३/०९/२०२३ रोजी दाखल करण्यात आले होते. दि. १८/०९/२०२३ दिपा संपत पेरकर हिची डिलेवरी सिझर झाल्या नंतर डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची फेयर तपासणी न करता सौ. दिपा संपत पेरकर हिला सुट्टी देण्यात आली.
सौ. दिपा संपत पेरकर हिचे सिझर झालेल्या पोटाच्या भागाला संपूर्ण टाके खुलून संसर्ग सारखे घातक जिवावर वेदनारी पस व सुजन तयार झाली. पोटाचे संपूर्ण टाके खुलून त्यानंतर ग्रामीण रूग्णालय, बल्लारपूर इथे तपासणी करिता नेले असल्यानी डॉ. मृणाल व डॉ. डोंगरे, डॉ. रामटेक यांनी टाळाटाळ करून दोन दिवसानी परत बोलावले. त्या दिवशी पण या तिन्ही डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची तपासणी न करता सौ. दिपा हिला परत पाठवून ‘पुन्हा दोन दिवसांनी बोलविण्यात आले. तरी सुध्दा या तिन्ही डॉक्टरांनी तिची प्रकृती खुप खराब असते वेळी सुध्दा तिला शासकिय ग्रामीण रूग्णालय बल्लारपूर इथे भरती न करता परत पाठविले. या तिन्ही डॉक्टरच्या निष्काळजी पणामुळे एका गरीब कुटुंबातील महिलेचा नाहाक बडी गेला असता. याला जबाबदार कोण? अशी पत्रकार परिषदेत संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बिले यांनी केली आहे. तसेच संबंधित डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना त्यांच्या शासकीय वैद्यकीय पदावरून बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आज पत्रकार परिषदेतून संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले, रुग्ण महिलेची बहीण प्रज्ञा कडूकर, राहुल कडूकर, गणेश बेतावर यांनी केली आहे.
या संदर्भाची माहिती शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महादेव चिंचोले यांना दिली असता. त्यांनी हा प्रकार गांभीर्याने न घेता उलट तिन्ही डॉक्टरांची पाठराखण केल्याचे दिसून आले.
सौ. दिपा संपत पेरकर हिची प्रकृती खुप चिंता जनक असल्यामुळे त्यांना एका खाजगीत दवाखान्यात भरती करण्यात आले. येथील डॉक्टर आणि सांगितले की यांची प्रकृती डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाली असून त्यांना वेळेवर उपचार न दिल्याने त्यांच्या टाक्याला गॅंग्रीन झाले.
आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share.

Leave A Reply

Exit mobile version