Star VCM News
गोंडवाना विद्यापीठाच्या 12 व्या वर्धापदिनानिमित्त डॉ. प्रमोद काटकर प्राचार्य सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
दिनांक 2 ऑक्टोबर 2023 ला गांधी जयंतनिमित्त 12 वर्षापूर्वी विद्यापीठाची स्थापन झाली, आणि म्हणुन दरवर्षी विद्यापीठाकडून विविध पुरस्कार दिले जातात. 2022-23 चा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांना मिळाला, पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. प्रकाश बोरकर, डॉ सतीश कन्नाके, डॉ उर्वशी माणिक, उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधमशेट्टीवर, डॉ एस बी किशोर, तसेच भारत आवले उपस्थीत होते,
महाविद्यालयाच्या शब्दगंधा वर्शिकांकाला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. दोनही पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर चे सर्व पद अधिकारी यानी प्राचार्य व महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्षा श्रीमती सुधाताई पोटदुखे,सचिव श्री भरत पोटदुखे,
श्री सुदर्शन निमकर उपाध्यक्ष सहसचिव डॉ किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य श्रीमती सागुनाताई तलांडी, श्री एस के रमजान, श्री राकेश पटेल, श्री जितेश पटेल, आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार, श्री संदीप गड्डमवार,श्री सुरेश पोटदुखे, श्री चंद्रशेखर वाडेगावकर, कार्याध्यक्ष श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार ,कोषाध्यक्ष श्री मनोहरराव तारकुंडे व सर्व विश्वस्त तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थांनी अभिनंदन केले.