Star VCM न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातओबीसी समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन आज ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महा मोर्चा काढण्यात आला होता.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला – मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला आज सात दिवस होऊ नये कुठल्याही सरकारच्या राजकीय प्रतिनिधीने साधी भेट सुद्धा दिली नाही. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतली नाही. चंद्रपूर शहरात दुपारी बारा वाजता सदर मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून या मोर्चाला सुरवात झाली.
या मोर्चात जवळपास आठ दहा हजार कार्यकर्ते मोर्चा सामील झाले होते. हा मोर्चा गांधी चौकातून निघून जिल्हाधिकार्यालय उपोषण स्थळी या मोर्चाची सांगता झाली.