अनेक युवकांना दिले अभिनयाचे धडे
चंद्रपूर (सचिनकुमार बोबडे ) :- येथील भिवापूर सुपर बाजार येथे आपले छोटीशी मच्छी दुकान घेऊन बसून नेहमी आपल्या या अतिरिक्त काहीतरी वेगळं करायचं या भावनेतून त्याच्या मनात वेगवेगळे कल्पना येत असून आपल्याला मासोळीच्या व्यवसायात न राहता आपल्याला आणखी काहीतरी करून दाखवायचे आहे, म्हणून त्या ध्येयनिष्ठ तरुणाचे नाव आहे,
मनोज तोकला. यांनी आपला प्रवास न थांबता सुरू केला. स्वतः स्टोरी लिहून आपल्या अनेक शॉट फिल्म निर्माण करून त्यांनी आपल्या कल्पनेचे एका परीने वाव दिले आहे. आत्तापर्यंत यांच्या सेव द चिल्ड्रन स्वच्छ भारत रमाडा तलाव सोच बदलो सही उमेदवार चुनो राजेशवाला 14 शॉर्ट फिल्म सुद्धा झाल्या आहेत नुसतेच प्रदर्शित झालेल्या मेरा एक अघोरी या हॉरर मूवीमध्ये त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली भूमिका निभवली आहे. त्याचप्रमाणे नुसत्याच प्रदर्शित झालेल्या तुझ्यात मी.. सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपली महत्वाची सह खलनायकाची भूमिका साकारली आहे. मनोज तोकला यांच्या मनामध्ये नेहमी काहीतरी वेगळे करण्याच्या भावनेतून त्याने आता नुकत्याच शॉर्ट फिल्ममध्ये काम सुद्धा केले आहे. शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना संधी देत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नवीन कलाकार कशा पद्धतीने आपल्या भूमिका निभवणार याकडे त्यांचे लक्ष राहते, त्याकरिता ते शॉर्ट फिल्म करण्याआधी वर्कशॉप त्या कलाकारांचा घेण्यात येतो. वर्कशॉप माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना अभिनयाचे धडे दिले आहेत. नेहमी कलाकारांना मार्गदर्शन ते करतात. शांतप्रिय स्वभाव असून अनेक युवकांना त्या माध्यमातून संधी देत असतात. आता नुसतेच त्यांनी एका शॉर्ट फिल्म काम सुद्धा सुरू केले आहे. पोलीस विभागावर आधारित ही शॉर्ट फिल्म 112 अपराधावर ही शॉर्ट फिल्म आधारित असून 112 डायल याचे महत्त्व सुद्धा या शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आता काही दिवसातच या शॉर्ट फिल्मचे सुद्धा ते काम सुरू करणार आहे. कलाकार ते सहनिर्माता असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. त्यांना पुढील वाटचाला करिता त्यांच्या मित्रमंडळी आणि हितचिंतक यांच्याकडून मनोज तोकला यांना पुढील प्रवासाकरिता खूप खूप शुभेच्छा देत आहे.