Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

स्टार VCM न्युज :-
चंद्रपूर :-
ति नेहमी प्रमाणे आपल्या शाळेत जाण्यासाठी निघाली. पण शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला तिचे जाणे शेवटचे ठरले!
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला जोरदार धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील महिला शिक्षिकेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

मृतक महिलेचं नाव अनिता किशोर ठाकरे (48) शहरातील श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे वास्तव्याला होत्या. त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या.

चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ठाकरे यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला, धडक दिल्यावर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version