चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातुन जल प्रदूषण इरईनदीत होत असताना येथील पर्यावरण प्रदूषण अधिकारी निद्रा अवस्थेत आहेत. यांना वारंवार थर्मल पॉवर स्टेशनमधुन होणाऱ्या प्रदूषणाची माहिती देत असताना सुद्धा याकडे जानिव पूर्व दुर्लक्ष करणे म्हणजे चंद्रपूरकरांच्या जिवाशी खेळणे होय. असे म्हटले तर वावगे होणार नाही.जहिरीले रासायनिक युक्त्य पाणी सोडणाऱ्या सी. एस. टी. पी. एसच्या अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी- संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.
कारण मागील काही दिवसापासून चंद्रपूर करांची जीवन वाहिनी असणाऱ्या इर ई नदीमध्ये अतिशय प्रदूषण युक्त विषारी द्रव्य पाणी सोडल्या जात असल्याचे निदर्शन येत असताना सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही. याबद्दल खंत व्यक्त केल्या जात आहे अधिकाऱ्यांचे कुठेतरी पाणी मुरल्या जात आहे .अशी चिंता व्यक्त करण्याची वेळ आता चंद्रपूरकरांना आली आहे.
या बाबत सिएसटिपीएस च्या मुख्य अभियंता आणि प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूरचे अधिकारी यादव
यांना फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला पण फोन रिसिव केले नाही.
आज सतत पाऊस सुरू असल्याने, सी एस टी पी एस यांनी सतत येणाऱ्या पावसाचा फायदा घेऊन रानवेंडली , विचोळानाला, चारगाव नाला, आणि सीएचपी नाला, या चारही नाल्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे विषारी द्रव्य सोडून ईरई नद्यांमध्ये प्रदूषण युक्त द्रव्य सोडल्या जात आहे. येथून वेगवेगळ्या प्रकारचे घातक विषारी द्रव्य असलेले पाणी जात असल्याने जल प्राणी, पशुपक्षी, आणि मानवीजीव यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
. नाल्यातील पाणी जळलेला कोळसा मिश्रित राख सी एस टी पी एस च्या. विद्युत केंद्रातून सोडली जात आहे.
विचोडा गावातील लागत असलेल्या नाल्यातून भव्य अँश लिख होऊन ती नाल्यात सोडल्या जात आहे.
या संदर्भाची माहिती माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संबंधित विभागाचे प्रदूषण अधिकारी तानाजी यादव यांना देण्यात आली असताना सुद्धा कुठलीही कारवाई होतनाही . आता राज्याचे मुख्यमंत्री तथा पर्यावरण मंत्री यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे